Advertisement

संगीता ठोंबरेंना मिळणार का गणेशाचा प्रसाद? नेकनुरमध्ये  गणेश मंडळांना भेटीगाठी

प्रजापत्र | Saturday, 14/09/2024
बातमी शेअर करा

चर्चेतले
अशोक शिंदेनेकनूर  दि. १३: आगामी  विधानसभा निवडणूकीसाठी केज मतदार संघात अनेक उमेदवार तयारीला लागलेले आहे. केज विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार संगीता  ठोंबरे यांनी केज विधानसभेची निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांनी मतदारसंघांमध्ये संपर्क वाढवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू करून गाठीभेटीवर भर देण्याचे काम सुरू केले असून नेकनुर मध्ये त्यांनी अनेक गणेश मंडळाच्या आरत्या केल्या या वेळी त्यांनी सामान्य जनतेशी संवाद साधला यामुळे जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून या वेळी केज विधानसभा मतदारसंघांमध्ये बदल होणार असून माजी आमदार संगीता  ठोंबरे यांना श्री गणेश विजयाचा प्रसाद देणार का अशी चर्चा आता केज विधानसभा मतदारसंघांमध्ये होत आहे.
२०१४ च्या केज विधानसभा निवडणुकीत संगीता ठोंबरे ह्या भरघोस मतांनी विजयी झाल्या होत्या, माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी केज विधानसभा मतदारसंघा मध्ये करोडो रुपयांचा निधी आणून विकासाची कामे केली आहे. येत्या महिन्यात विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार असून त्या पार्श्वभूमीवर माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी केज मतदार संघात जनसंपर्क वाढवला आहे. ठोंबरे यांच्या आमदारच्या कार्यकाळात त्यानी सर्व सामान्य लोकांच्या कामाला भर दिला होता, त्या मूळे मतदार संघात सर्वसामान्य नागरिक आणि कार्यकर्ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत केज मतदार संघातुन संगीता ठोंबरे यांना पुन्हा एकदा विधानसभेवर पाठवण्याची पूर्वतयारी करत असताना दिसून येत आहे.  

Advertisement

Advertisement