केज दि.१२ (प्रतिनिधी )- नीटची तयारी करणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीवर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदरील तरुणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली. या प्रकरणी आरोपीविरोधात केज पोलीस ठाण्यात बलात्कारासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर सुरज गुंड याने सातत्याने अत्याचार केला. तसेच या मुलीचे नग्न फोटो काढण्यात आले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर सतत बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी पिडितेने केज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार आरोपी सुरज गुंड याच्या विरोधात बलात्कारासह अॅट्रॉसिटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, संतोष गिते हे करत आहेत.
बातमी शेअर करा