बीड दि.०२ (प्रतिनिधी)- येथील वर्दळीचे ठिकाण असलेल्या माळीवेस चौकात एका दुचाकीस्वारांकडून गावाकडे विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या विदेशी दारूचा साठा बीड शहर पोलिसांनी जप्त केला आहे.पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
आज श्रावण महिना संपत असून उद्यापासून अनेकजण पुन्हा मांसाहार आणि दारूचे व्यसन सुरु करत असल्यामुळे चौसाळा येथील दत्ता सुबराव जगताप याने बीडमधून विदेशी दारूची मोठया प्रमाणावर खरेदी केली होती. ही दारू तो विक्री करण्यासाठी दुचाकीवरून गावाकडे निघत असतानाच त्याला माळीवेसमध्ये बीड शहर पोलिसांनी पकडले. या कारवाईत १ लाख ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाईत सय्यद अशपाक,श्री.सिरसाट यांच्यासह शहर पोलिसांचा सहभाग होता.
बातमी शेअर करा