बीड-राज्यस्थानी मल्टीस्टेटच्या माध्यमातून हजारो ठेवीदारांना गंडविणाऱ्या चंदुलाल बियाणीचा मुलगा असलेल्या अभिषेकला पुण्यातून बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज पहाटे ताब्यात घेतले आहे.मागच्या अनेक महिन्यांपासून मात्र चंदुलाल बियाणी फरार असून आज पहाटे त्यांच्या मुलाला बीड पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून मल्टिस्टेट प्रकरणातील आरोपी बीडच्या पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरत होते.पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी पदभार घेतल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासाला आणखीन वेग येऊ लागला आहे.काल ज्ञानराधाच्या यशवंत कुलकर्णीला पुण्यातून ताब्यात घेतल्यानंतर आज पहाटे राज्यस्थानी मल्टीस्टेटच्या चंदुलाल बियाणीच्या मुलगा अभिषेकला आर्थिक गुन्हे शाखेने पहाटे ताब्यात घेतले.सध्या अभिषेक बियाणीला बीडला आणण्यात येत असल्याची माहिती असून चंदुलाल बियाणी अद्याप फरार आहेत.
बातमी शेअर करा