किल्लेधारूर दि.३०( प्रतिनिधी )- डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली धारूर शहरात तहसील कार्यालयावर शुक्रवारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. संविधानीक हक्का साठी व तालुक्यातील महत्वाच्या प्रश्नांवर हा मोर्चा काढण्यात आला. तहसीलदारांना मागण्याचे निवेदन देण्यात आले मोर्च्यातील घोषणांनी शहर व तहसील परीसर दणाणुन गेला होता.
सविस्तर माहिती अशी कि, हा मोर्चा छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरु करण्यात आला. यात आरक्षणासह माजलगाव मतदार सांघातील गोरगरीब लोकांच्या संविधानिक योजना कोण हडप करत शिपाई ते अधिकारी आमदार यांच्या पर्यंत दलाली दिल्याशिय काम होत नाहीत याचा विचार करा आज कामगार निराधार,भूमिहीन शेतकरी गायरानधारक,विधार्थी यांचा वालीच चोर आहे. खाजगीकरण करून आरक्षण संपवल जात आहे. तर दुसरीकडे आरक्षणाला राजकीय वळण देऊन संविधान धोक्यात आणत महाराष्ट्रात जातीवाद निर्माण केला जात आहे. महिला अत्याचार वाढत असताना सरकार तुगलकी भूमिका घेत गोरगरिबांच्या जीवनाशी खेळत आहे. त्याच बरोबर स्थानिक धारूर,वडवणीत लोकांच्या पाण्याच्या योजना एमआयडीसी धारूर घाट रुंदीकरण,आरोग्य सेवा,बोगस रस्ते या बाबत तातडीने तीन दिवसात निर्णय घ्या नसता पुन्हा हजारो समर्थक बरोबर घेऊन तहसील कार्यालयाला कूलपं ठोकून आंदोलन छेडण्याचा इशारा या मोर्चेतून डॉ.जितेंद्र ओव्हाळ यांनी दिला आहे. हा मोर्चा सरकार विरोधात असल्याचे सांगत सरकारने भानावर यावं लोकांच्या संविधानिक अधिकार योजना बाबत चालढकल करू नका नसता याद राखा असा इशारा देत प्रशासनाला आपल्या विविध मागण्याचे निवेदन दिले. या मोर्चात प्रशांत ओव्हाळ, राकेश सिरसाठ, किरण शिंदे, दया वाघमारे, तुषार भालेराव, अमोल शिरसाठ, शिरपती ओव्हाळ, अविनाश घायाळ, विशाल ओव्हाळ, सुनील गायसमुद्रे अशोक भालेराव, महेश शिरसाठ, अनिल गायकवाड, सचिन साळवे, हिरामण काळे, सुनीता जाधव, समीर शेख, अकबर शेख, अशोक वालेकर, वाजेद शेख, आकाश जाधव यांच्यासह डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते.