बीड दि.२३ (प्रतिनिधी )- घरगुती कारणाला कंटाळून एक शिक्षक व्हॉटस्अॅपवर स्टेटस ठेवून बेपत्ता झाला होता. त्याचा शोध कालपासून पाटोदा पोलीस घेत होते. आज सकाळी सौताड्याजवळ शिक्षकाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली.
अधिक माहिती अशी कि,गजेंद्र गुंडाळे हे पाटोदा येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी आई आणि पत्नीची साथ मिळत नाही, असे स्टेटस ठेवून बेपत्ता झाले होते. याबाबत पाटोदा पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली होती. पोलीस या शिक्षकाचा सौताडा परिसरामध्ये शोध घेत होते. या शिक्षकाची मोटारसायकल आणि चप्पल धबधब्याजवळ आढळून आली होती. काल दिवसभर शिक्षक सापडला नव्हता, मात्र आज या शिक्षकाचा धबधब्याच्या काही अंतरावर मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी मृत्यूची नोंद करत मृतदेह शवविच्छेदनासाठी आणला होता. याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
बातमी शेअर करा