बीड (प्रतिनिधी); कमी उत्खनन दाखविण्यासाठी एक लाखाची लाच घेताना अटक करण्यात आलेल्या मंडळाधिकारी सचिन सानपला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.द्वितीय न्यायाधीश व्ही.एच पटवदकर यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला .
बीडचा मंडळाधिकारी सचिन सानप याला बुधवारी एसीबीने एक लाखाची लाच घेताना अटक केली होती. त्याच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्याला गुरूवारी बीडच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला शुक्रवार (दि.23) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
बातमी शेअर करा