बीड दि .२१ (प्रतिनिधी)- शहरातील बार्शी नाका परिसरातील निखील काळे या तरूणाने व्हॉटस्अॅपला स्टेटस ठेवून आत्महत्या केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सकाळी जेंव्हा निखील गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे घरच्यांनी पाहीले तेंव्हा सर्वजण हादरून गेले.
सविस्तर माहिती अशी कि, शहरातील बार्शी नाका परिसरातील तरूण निखील दत्तात्रय काळे या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी रात्री अकरा वाजता व्हाट्सअपला enjoy every moment everyday is last day in life, enjoy this moment any expected असे व्हाट्सअप स्टेटस ठेवून गळफास घेऊन जीवन संपवले.एक वर्षापूर्वीच या तरुणाच्या वडिलाचे हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने वडिलांचे निधन झाले होते,तेव्हापासून निखिल ने घरची सर्व जबाबदारी घेऊन योग्यरित्या पार पाडत होता,त्यामुळे घरातीलच कर्त्या तरुणाने जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त करत असून,आत्महत्याचे कारण समजू शकले नाही.