Advertisement

ज्ञानराधाच्या ठेवीदाराचा पहिला बळी !

प्रजापत्र | Monday, 19/08/2024
बातमी शेअर करा

बीड- वडवणी येथील ज्ञानराधाच्या शाखेत ठेवी अडकून पडल्याने पैशांअभावी उपचार न मिळाल्याने वडवणी येथे पहिला बळी गेला आहे. यामुळे संताप व्यक्त करण्यात येत असून, ठेवी परत देण्याची मागणी करण्यात येत आहे. भगवान दत्तात्रय बारटक्के रा. वडवणी असे मयताचे नाव असून, त्यांचे ज्ञानराधा मल्टीस्टेट वडवणी शाखेत ७ लाख रुपये अडकलेले आहेत.

 ज्ञानराधा बंद पडल्याने ही रक्कम परत मिळणार की, नाही. ते या चिंतेत होते. या दरम्यान त्यांना हृदयरोगाची लागन झाली. जास्त त्रास होत असल्याने दावाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी बायपास शस्त्रक्रिया करण्याचे सांगितले होते. परंतु जवळचा सर्व पैसा ज्ञानराधा मल्टीस्टेट मध्ये अडकल्याने हातात फुटकी कवडी नव्हती तर अनेकांकडे पैशांची मागणी केली परंतु
पैशांची तजवीज होईपर्यंत खुप उशीर झाला अन् भगवान बारटक्के यांची उपचाराअभावी प्राणज्योत मालवली. यामुळे ज्ञानराधाने पहिला बळी घेतल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. तर प्रशासनाने वेळकाढूपणा केला तर आणखी अशा घटना वाढतील त्यामुळे यंत्रणा हलवून ठेवीदारांच्या ठेवी परत मिळवून द्याव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.

 

Advertisement

Advertisement