बीड दि.१७ (प्रतिनिधी)-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकाळ पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या ठिकाणी नवीन अधिकाऱ्यांना पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी नियुक्त्या दिल्या आहेत.बहुचर्चित असलेल्या आष्टी पोलीस ठाण्याला पोलीस निरीक्षक सोमनाथ मधुकर जाधव तर माजलगाव शहर पोलीस ठाण्याला पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांची ऑर्डर झाली आहे.
याशिवाय सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्रसिंग ठाकूर यांना नियंत्रण कक्षातून अप्पर पोलीस अधिक्षक अंबाजोगाई यांचे वाचक,सपोनि गजानन क्षीरसागर छत्रपती संभाजीनगरवरून शिवाजी नगर बीड,सपोनि नितीन श्रीपतराव गुट्टावार यांची परळी शहरला बदली करण्यात आली.याशिवाय आष्टी शहरला नियंत्रण कक्षातून सोमनाथ जाधव तर आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांची माजलगाव शहराला बदली झाली आहे.आष्टीत मागच्या महिनाभरात दरोड्याच्या घटनेत प्रचंड वाढ झाली होती.या ठिकाणी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.मर्जीतील अधिकाऱ्यांसाठी आष्टीला पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपअधिक्षक मिळत नाहीत का ? असा सवालही उपस्थितीत करण्यात येत होता.त्यापार्श्वभूमीवर आता आष्टी ठाण्याला पोलीस निरीक्षक म्हणून सोमनाथ मधुकर जाधव यांना नियुक्ती देण्यात आली आहे.दरम्यान पोलीस अधिक्षक यांचे पद मात्र शहरासाठी अजूनही रिक्त आहे.
बातमी शेअर करा