बीड-जिल्हयात वाळू माफियांचा नंगानाच नवा राहिलेला नाही.अवैध वाळू वाहतुकीमुळे तर जिल्ह्यात कायदा व सुववस्थेची देखील परिस्थिती निर्माण होत असल्याने आता नूतन पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी वाहतूक शाखेचे प्रमुख तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांच्यावर माफियांची दादागिरी संपवून टाकण्याची जवाबदारी दिली आहे. त्यानुसार पहाटे २ च्या सुमारास शहागडच्या पुलाजवळ माफिया वाळू काढत असताना पोलिसांनी छापा मारला असता माफियानी टॅक्टरमधून पळ काढला. यावेळी पोलिसांनी चार मोटारसायकल व एक कार ताब्यात घेतली आहे.दरम्यान माफियाच्या विरोधात सुरु झालेल्या कारवायामुळे गोदापात्रात सध्या खळबळ उडाली आहे.
बीड जिल्हयात वाळूची तस्करी जोरात आहे. माफियांचा राज असलेल्या गोदापात्रात दिवस-रात्र माफिया तळ ठोकून असतात.त्यामुळे वाळूची होणारी अवैध वाहतूक तातडीने थांबायला हवी,आणि अश्या माफियांवर गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप त्यांच्यावर पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी जवाबदारी देत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मागच्या दोन दिवसापासून गोदापात्रात कारवाईचे सत्र सुरु झाले आहे. पहाटे २ वाजता शहगडच्या पुलाजवळ छाप्पा मारून पोलिसांनी चार मोटारसायकल व 1 स्कर्पिओ गाडी ताब्यात घेतली आहे. सुभाष सानप व त्यांच्या टीमने केलेल्या या कारवाईमुळे सध्या गोदापात्रात खळबळ उडाली आहे.
बातमी शेअर करा