Advertisement

पेट्रोल-डिझेलची सलग १३ व्या दिवशी वाढ;पाहा बीडमधील आजचे दर

प्रजापत्र | Friday, 19/06/2020
बातमी शेअर करा

बीड-गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेली इंधन दरवाढ आजही सुरुच असल्याचे दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शुक्रवारी (दि.१९) सुद्धा वाढ झाली असून सलग १३ व्या दिवशी इंधनाचे दर वाढले आहेत.बीडमध्ये पेट्रेल ०.५३ पैसे तर डिझेल ०.५८ पैशांनी महागले. 

                               देश अनलॉक होण्यास सुरुवात झाल्यानंतर वाहने रस्त्यावर धावू लागली आणि मागील तेरा दिवसांपासून इंधनाची दरवाढ सुरु झाली.बीडमध्ये शुक्रवारी (दि.१९) पेट्रोल-८६.२८ तर डिझेल-७५.४६ रुपये दर आहे.तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोलच्या किंमतीत ०.५३ पैसे आणि डिझेलमध्ये ०.५८ पैशांची वाढ केली.सलग तेराव्या दिवशी इंधनाचे दर वाढले असून ही बाब सर्वसामान्यांच्या अडचणीत भर टाकणारी ठरत आहे. 
 

Advertisement

Advertisement