बीड दि.९ (प्रतिनिधी)- जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त आज दुपारी बीड शहरात भव्य रॅली काढण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेली रॅली माळीवेस, सुभाष रोड, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौक, बसस्टैंड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगर रोडमार्गे सामाजिक न्याय भवन परिसरात दाखल झाली. विशेष म्हणजे या रॅलीत आदिवासी समाज बांधव, भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. लाल झेंडे हातात घेवून रॅलीत सहभागी झालेल्या समाज बांधवांनी अतिशय शिस्तीचे दर्शन घडविले. पायी रॅली पाठोपाठ मोटारसायकल रॅलीने देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. एकलव्य सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष युवराज बड़े यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
बातमी शेअर करा