Advertisement

टॅक्टरमधील उसाखाली दबून २५ मेंढ्या दगावल्या

प्रजापत्र | Thursday, 14/01/2021
बातमी शेअर करा

टॅक्टरमधील उसाखाली दबून २५ मेंढ्या दगावल्या        

             
माजलगाव -जय महेश साखर कारखान्याकडे जाणारे एक ट्रँक्टर अचानक उलटल्याने त्यातील उसाखाली दबून २५ मेंढ्या दगावल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेचार वाजता घडली. शहरापासून जवळच परभणी रोडवर हा अपघात घडला. 
             माजलगाव शहराकडून जय महेश कारखान्याकडे एक डबल ट्रॉलीचे ट्रॅक्टर ऊस घेऊन जात होते. परभणी रोडवर हे ट्रॅक्टर अचानक उलटले. यावेळी रस्त्याच्या बाजूने माजलगावकडे जाणाऱ्या  २० ते २५ मेंढ्यां ट्रॅक्टरखाली दबल्या गेल्या. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दबलेल्या मेंढ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. जवळपास २५ मेंढ्या एकाचवेळी दगावल्याने मेंढपाळाचे मोठे नुकसान झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement