Advertisement

प्रेम प्रकरणातून १७ वर्षीय विद्यार्थीनीची आत्महत्या

प्रजापत्र | Friday, 02/08/2024
बातमी शेअर करा

बीड दि.०२ (प्रतिनिधी)- प्रेम प्रकरणातून १२ वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शिरूर कासार तालुक्यात घडली. या प्रकरणात दुपारी उशिरापर्यंत पोलीसांत नोंद झालेली नव्हती. 

शिरूर कासार तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय विद्यार्थीनीने दि.१ ऑगस्ट रोजी विष प्राशन केले होते. तिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आज पहाटे सदरील मुलीचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची घटना घडली. सदरील विद्यार्थीने प्रेम प्रकरणातून जीवन संपल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणात दुपारी उशिरापर्यंत पोलीसांत नोंद झालेली नव्हती.

Advertisement

Advertisement