Advertisement

 स्मार्ट टिव्हीवर चोरट्यांनी मारला डल्ला

प्रजापत्र | Thursday, 25/07/2024
बातमी शेअर करा

बीड दि.२५ (प्रतिनिधी)- पेठ बीड भागातील कडबा मंडी बाजारतळ येथे असलम जाफर यांचे दुकान आहे.या ठिकाणी दोघा चोरट्यांनी दुकानाचा पत्रा उचकून  आतमध्ये ठेवलेली ३२ इंची स्मार्ट टिव्ही चोरून नेली.या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

 

सविस्तर माहिती अशी कि,कडबा मंडी येथे असलम जाफर यांचे चिक्की सेंटरचे दुकान आहे. या ठिकाणी आरोपी आमेर खान,शेख अजहर शेख अकरम या दोघांनी संगनमत करत दुकानाचा पत्रा उचकून आतमध्ये ठेवलेली ३२ इंच एलईडी स्मार्ट टिव्ही चोरून नेली व दुकानासमोर लावलेल्या हातगाड्याची तोडफोड केली. या प्रकरणी फिर्यादी असलम मनियार यांच्या फिर्यादीवरून आरोपी आमेर खान व शेख अहजर शेख अकरम यांच्या विरोधात पेठ बीड पोलीस ठाण्यात कलम ३०५, ३३१ (४), ३२४(४) (५), ३(५) प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो. ह.राठोड हे करीत आहेत.

Advertisement

Advertisement