Advertisement

 बीडमधील सर्वच रस्त्यांवर ट्रॅफिक जाम

प्रजापत्र | Monday, 22/07/2024
बातमी शेअर करा

 बीड दि.२२ (प्रतिनिधी) शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांवर ट्रॅफिक जाम होवू लागली आहे. आज सकाळपासून अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले. भाजी मंडई, सुभाष रोड, शाहु नगर, बशीरगंज चौक, जालना रोड यासह इतर ठिकाणी ट्रॅफिक जामचे चित्र पहायला मिळत असुन ट्रॅफिक पोलीस मात्र कुठेच दिसत नव्हते. रस्त्यांवर उभ्या केलेल्या आडव्या- तिडव्या गाड्यांमुळे जोगाजाग ट्रॅफिक जाम झाली होती. ट्रॅफिकचे कसलेच नियोजन नसल्यामुळे वाहन धारकांसह पायी चालणाऱ्यांनाही ट्रॅफिक जामचा त्रास सहन करावा लागला.

Advertisement

Advertisement