Advertisement

सिरसदेवी फाट्यावर बस दुचाकीचा अपघात 

प्रजापत्र | Saturday, 20/07/2024
बातमी शेअर करा

तलवाडा दि.२० (वार्ताहार)- गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाणे हद्दीतील सिरसदेवी फाट्यावर आज (दि.२०) शनिवार रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास माजलगाव कडून पुणेच्या दिशेने जाणाऱ्या बसने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकी बसच्या खाली दबल्यामुळे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. 

 

              अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाणे हद्दीतील सिरसदेवी फाट्यावर आज (दि.२०) शनिवार रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास माजलगाव कडून पुणेच्या दिशेने जाणाऱ्या बसने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकी बसच्या खाली दबल्यामुळे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना बीड येथील खाजगी हॉस्पीटलमध्ये पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. कृष्णा लोखंडे,करण उनवणे हे दोघेही रा.रूई येथील रहिवाशी आहेत. घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा करून बस तलवाडा पोलीस स्टेशन येथे आणण्यात आली आहे. तलवाडा पोलिस पुढील तपास करीत आहेत. 

Advertisement

Advertisement