Advertisement

धनंजय मुंडेंवर राष्ट्रवादीने दिली नवीन जबाबदारी

प्रजापत्र | Thursday, 18/07/2024
बातमी शेअर करा

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते तथा राज्याचे कृषीमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पक्षाने आणखी एक जबाबदारी टाकली आहे. राज्यभरात एक फायरब्रॅन्ड वक्ते म्हणून ओळख असलेल्या धनंजय मुंडेंवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख प्रवक्तेपदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबतची घोषणा एका पत्रकारपरिषदेच्या माध्यमातून केली आहे.
धनंजय मुंडे हे राज्यातील एक प्रभावी वक्ते म्हणून ओळखले जातात.राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्ये त्यांचा कायम समावेश राहिलेला आहे. आता जनतेपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहचता यावे, सरकारची कामे जनतेपर्यंत पोहचवीत आणि विरोधकांचा समाचार घेता यावा यासाठी राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांच्यावर पक्षाचे प्रमुख प्रवक्ते म्हणून जबाबदारी टाकली आहे.त्यामुळे आता धनंजय मुंडे हे नव्या जबाबदारीत अधिक आक्रमकपणे समोर येताना दिसतील. 

Advertisement

Advertisement