Advertisement

पंकजा मुंडेंचा विजय ओबीसीसाठी ऊर्जादायी-ढाकणे

प्रजापत्र | Saturday, 13/07/2024
बातमी शेअर करा

पुणे-ओबीसीच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा महाराष्ट्र विधानपरिषदेत झालेल्या विजयामुळे राज्यातील ओबीसी वर्गामध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. पाच वर्षापासून जबाबदारीचे पद नसल्यामुळे त्यांना विकासाला न्याय देता आला नाही. पंकजाताईं विधान परिषदेच्या आमदार झाल्यामुळे विकास कामाला पुन्हा एकदा गती मिळणार असून त्यांना मंत्री करण्यात यावे अशी मागणी वंजारी ओबीसी विकास महासंघाचे राष्ट्रीय संपर्क प्रमुख दादासाहेब ढाकणे यांनी केली आहे.

     शुक्रवारी विधानपरिषद सदस्य निवडीसाठी मतदान पार पडले. यामध्ये भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा गोपीनाथराव मुंडे यांचा महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत २६ मते घेऊन विजय झाला. हा ओबीसी वर्गासाठी आनंदाचा क्षण असून, विजयाची बातमी कळताच राज्यातील मुंडे समर्थकांनी जल्लोष साजरा केला आहे. दरम्यान मुंडे यांना तातडीने मंत्री पद देण्यात यावे अशी मागणी वंजारी ओबीसी विकास महासंघाचे राष्ट्रीय संपर्क प्रमुख दादासाहेब ढाकणे यांनी केली आहे.

Advertisement

Advertisement