Advertisement

पंकजा मुंडे झाल्या आमदार

प्रजापत्र | Friday, 12/07/2024
बातमी शेअर करा

मुंबई-राज्य विधानपरिषदेच्या ११ जागा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे विजयी झाल्या आहेत.या निवडणुकीत विजयासाठी प्रत्येकाला २३ जागांचा कोटा निश्चित करण्यात आला होता,त्यांना २६ मते मिळाली.त्यामुळे आता २०१९ मधील पराभवानंतर त्या प्रथमच विधिमंडळात गेल्या आहेत.
  राज्य विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असल्याने शुक्रवारी मतदान झाले होते. दुपारी ४ वाजेपर्यंत विधिमंडळात मतदान झाल्यानंतर त्याची मतमोजणी ५ वाजता सुरु झाली.विजयासाठी २३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. भाजपने पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. यात पंकजा मुंडे प्रथम क्रमांकाच्या उमेदवार होत्या. त्यांना २६ मते मिळाली. कोटा पूर्ण झाल्यामुळे त्या विजयी झाल्या आहेत. आता त्या विधानपरिषद सदस्य म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानमंडळात २०३० पर्यंत असणार आहेत.बीड जिल्हयातील मुंडे समर्थक आणि भाजपमध्ये यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.  

 

Advertisement

Advertisement