Advertisement

कुंडलीक खांडेची शिंदेंच्या शिवसेनेतूनही हकालपट्टी

प्रजापत्र | Saturday, 29/06/2024
बातमी शेअर करा

बीड: पंकजा मुंडेंचा राजकीय विश्वासघात आणि धनंजय मुंडे यांची गाडी फोडण्याचा कट असलेली ऑडीओ क्लीप समोर आल्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडेची शिंदेंच्या शिवसेनेतून देखील हकालपट्टी झाली आहे. यापुर्वी गुटखा प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर कुंडलीक खांडेची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी झाली होती. 
पंकजा मुंडेंचा राजकीय विश्वासघात , धनंजय मुंडेंची गाडी फोडण्याचा कट आणि मनोज जरांगे यांच्याबद्दल एकेरी वक्तव्याच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे वादग्रस्त ठरलेला शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेवर शिंदे सेनेने कारवाई केली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरुन खांडेला हकलण्यात आले आहे.

 

 

 

 

Advertisement

Advertisement