Advertisement

कचरा गोळा करणाऱ्या दोन महिला पोलिसांच्या ताब्यात

प्रजापत्र | Friday, 21/06/2024
बातमी शेअर करा

बीड-शहरातील अंकुश नगर भागात मागच्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्या होत्या.चोरी,गंभीर स्वरूपाचे दरोड्यासोबत,भुरट्या चोरटयांनी ही या परिसरात डोके वर काढले होते.शिवाजी नगर पोलिसांनी या भागातून कचरा गोळा करणाऱ्या दोन महिलांना चोरी करताना पकडले आहे.पेठ बीड पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याची मोटर या महिलांनी लंपास केली होती.यात या महिलांचा सहभाग आढळून आल्याचे कळते. 

 

               शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागच्या काही दिवसांपासून चोरीच्या वाढलेल्या घटनेमुळे सामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.अंकुश नगरमध्ये मागच्या ८-१० दिवसांत अनेक घरांना चोरटयांनी लक्ष केलेले आहे.पेठ बीड पोलीस ठाण्यातील कर्मचारी श्री.सानप यांची पाण्याची मोटार भल्या पहाटे लंपास करण्यात आली होती.याशिवाय त्या परिसरातून आणखी एक मोटार चोरीला गेली होती.दरम्यान सदर मोटर कचरा गोळा करणाऱ्या दोन महिलांनी लंपास केल्याचे समोर आल्यानंतर या भागातील नागरिकांनी त्या दोन महिलांना पकडून शिवाजी नगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.सध्या या महिलांची चौकशी सुरु असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.या महिलांनी ज्या दुकानदारांना ही मोटार विकली होती त्याची ही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे

Advertisement

Advertisement