Advertisement

बीडमध्ये धाडसी घरफोडी

प्रजापत्र | Friday, 14/06/2024
बातमी शेअर करा

 बीड (प्रतिनिधी) शहरातील - शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील चऱ्हाटा रोड लोकाशा नगर येथे अज्ञात चोरट्यांनी दरवाज्याचे लॉक तोडून आतमध्ये प्रवेश करत कपाटातील पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने व  दीड लाख रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

 

 

बीड शहरातील चऱ्हाटा रोड लोकाशा नगर भागातील रामचंद्र सुंदर येवले यांच्या घराच्या दरवाज्याचे लॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी
घरामध्ये प्रवेश करत कपाटासह इतर ठिकाणी ठेवलेले दागिने आणि रोकड लंपास केली. यावेळी चोरट्यांनी किचनमधील प्रत्येक डब्बा चेक केला. इतर खोल्यातील सामानाची नासधूस देखील केली. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Advertisement

Advertisement