Advertisement

बीड जिल्ह्यात बर्डफ्लूच, पण ......

प्रजापत्र | Monday, 11/01/2021
बातमी शेअर करा

बीड : बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे कावळ्यांचा मृत्यू झाला होता. त्या कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचे  अहवाल आले असून त्या कावळ्यांचा मृत्यू बर्डफ्लू मुळेच झाल्याचे समोर आले आहे. मात्र असे असले तरी त्यातही दिलासादायक वृत्त आहे, ते म्हणजे बीड जिल्ह्यात आढळलेला विषाणू मनुष्यांसाठी तितकासा हानिकारक नसल्याचे समोर आले आहे. 
बीड जिल्ह्यात जो विषाणू सापडला आहे, तो H५N ८ या प्रकारातील आहे. तर राज्याच्या इतर भागात सापडलेला विषाणू  H१N ८ या प्रकारातील आहे. बर्डफ्लूच्या बाबतीत H१N ८ हा विषाणू जास्त संसर्ग पसरवणारा मानला जातो. तर H५N ८  ची संसर्गक्षमता तुलनेने कमी आहे. 
मुळात बर्डफ्लूचे विषाणू मानवी शरीरात पसरण्याचे प्रमाण फारसे नाही. संसर्गित पक्षांच्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाच याची बाधा होऊ शकते. आतापर्यंत बर्डफ्लूचा प्रसार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला झाल्याचे समोर आलेले नाही. मात्र बर्डफ्ल्यूची बाधा झाल्यास त्यात मृत्यूचे प्रमाण अधिकआहे, त्यामुळे अधिकची काळजी घेतली जाते. 
मात्र H५N ८ हा विषाणू सहसा मनुष्यांमध्ये पसरत नाही. या विषाणूचा संसर्ग जंगली पक्षी आणि कोंबड्यांमध्ये होतो. बीड जिल्ह्यात आढळलेले दोन्ही नमुने हे H५N ८ या प्रकारातील आहेत. याची मनुष्यांना संसर्ग करण्याची क्षमता फारशी नसते, हि बीड जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. 

हेही वाचा 

-----
चिकन खाणे धोकादायक  आहे का ? 
बर्डफ्ल्यूची चर्चा सुरु झाल्यापासून चिकन खाण्याने बर्डफ्ल्यू होतो का हा प्रश्न विचारला जात आहे. मात्र भारतीय पद्धतीत ज्या पद्धतीने चिकन शिजवले जाते, त्या पद्धतीत विषाणू जिवंत राहू शकत नाही असे या क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे. पशुवैद्यकीय तज्ञ आणि डॉक्टर सुद्धा शिजवलेले चिकन खाल्ल्याने बर्डफ्ल्यूचा संसर्ग होत नसल्याचे सांगत आहेत. 
---

Advertisement

Advertisement