Advertisement

मस्साजोग जवळ कार मोटारसायकल अपघातात एक ठार तर दुचाकीने घेतला पेट

प्रजापत्र | Sunday, 10/01/2021
बातमी शेअर करा

केज  केज बीड रोडवरील मस्साजोग नजीक कार व मोटारसायकल च्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून मृताची ओळख अद्याप पटलेली नाही .
               रविवारी (दि.१०) सायंकाळी सहा च्या सुमारास मोटारसायकल बीडकडून केजकडे येत असताना मस्साजोग जवळील पेट्रोल पंपा समोर समोरून येणाऱ्या कारला (एम.एच.23 वाय 0121) दुचाकीची जोराची धडक बसली. यात दुचाकीवरील इसम गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला.  तर याचवेळी धडक बसलेल्या दुचाकीने पेट घेतल्याने दुचाकी जाळून खाक झाली आहे. तर कारचेही मोठे नुकसान झाले असून अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

 हेही वाचा 

Advertisement

Advertisement