Advertisement

पाटोदा तालुक्यात कावळ्यांच्या मृत्यू.......गूढ वाढले...……!

प्रजापत्र | Sunday, 10/01/2021
बातमी शेअर करा

बीड दि.१० - देशातील सहा राज्यांमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’चा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट होत असताना पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे २६ कावळे मृतावस्थेत आढळून आले आहेत.

                    मुगगाव येथे दोन दिवसांत २६ कावळे मृतावस्थेत आढळून आले. सुरुवातीला ग्रामस्थांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र अनेक कावळे मृत्युमुखी पडलेले दिसल्यानंतर ग्रामस्थांनी सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राचे प्रमुख सिद्धार्थ सोनवणे यांना माहिती दिली. त्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर अधिकाऱ्यांचे पथक गावात दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी करून कावळ्यांचे मृत अवशेष ताब्यात घेतले.

 

Advertisement

Advertisement