Advertisement

माजलगावात दोन घरे फोडली

प्रजापत्र | Saturday, 09/01/2021
बातमी शेअर करा

माजलगाव-शहरातील गजानन नगर व  फुले नगरमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत.या दोन ठिकाणी झालेल्या चोऱ्यामधून सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल चोरटयांनी लंपास केला.
                  शहरातील गजानन नगर येथील रहिवासी रामेश्वर भंडारी हे परिवारासह गुरुवारी (दि.७) वडवणी येथील आपल्या मुलीला भेटण्यास गेले होते.या वेळी घराला कुलूप असल्याने घरात कोणीच नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी रात्री घराच्या खिडकीच्या जाळ्या तोडून आत प्रवेश केला.यावेळी चोरट्यांनी घरातील सामानाची तोडफोड करून कपाटातील ५० हजार नगदी,एक ग्रॅमच्या तीन सोन्याच्या अंगठ्या,दीड ग्रॅम सोन्याचे झुंबर असा दोन लाखांचा ऐवज लंपास केला.त्याचप्रमाणे शहरातील फुले नगर भागात राहणारे विठ्ठल विश्वनाथ बोबडे यांच्या घरातून २० हजारांचे दोन मोबाईल,पाच हजार नगदी रुपये गुरुवारी रात्री लंपास केले.या प्रकरणी माजलगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
-----------------------------------------------------

 

Advertisement

Advertisement