Advertisement

चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यु

प्रजापत्र | Friday, 08/01/2021
बातमी शेअर करा

माजलगाव : तालुक्यातील गंगामसला येथील मदन सुदामराव सोळंके या पाच वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत बुडून दुर्देवी मृत्यु झाल्याची घटना आज दि. 8 शुक्रवारी घडली आहे.   

 तालुक्यातील गंगामसला येथील मदन सुदामराव सोळंके यांच्या घरात सांडपाणी साठवण्यासाठी आणलेली टाकी आहे पण टाकी फुटल्याने टाकीचा वरील भाग कापुन ठेवलेला आहे. शुक्रवारी त्यांचा मुलगा उमेश हा खेळत असतांना हातातील प्लेट या टाकीत पडल्याने काढण्यासाठी गेला आणि त्याचा या टाकीत तोल गेला. खाली डोके वर पाय झाल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला आहे. दरम्यान या घटनेने गंगामसला परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

Advertisement

Advertisement