Advertisement

पंकजा मुंडे म्हणाल्या 'मला द्या शेवटची संधी'

प्रजापत्र | Wednesday, 24/04/2024
बातमी शेअर करा

बीड  : मला काही पैसे कमवायचे नाहीत, नावाची, प्रसिद्धीची लालसा नाही. एक काटा माझ्या मनात रुतलेला आहे. गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न माझ्या डोळ्यात आहेत. ते पूर्ण करण्याची अशी संधी पुन्हा येणार नाही. मला माझ्यासाठी नाही, तर जनतेसाठी पद हवे आहे.१० वर्षांपूर्वी  ४ तारखेला मला गोपीनाथ मुंडेंना हार घालायचा होता, अंत्यसंस्कार करावा लागला. ती सल दूर करण्यासाठी  ही  शेवटची संधी मला द्या असे भावनिक आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडेंनी केले . बीड लोकसभा निवडणुकीसाठी भाजप महायुतीच्या उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्या नंतर आयोजित जाहीर सभेत त्या  बोलत होत्या.  

यावेळी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे, उमेदवार पंकजा मुंडे, खा. प्रीतम मुंडे यांच्यासह आ. सुरेश धस, आ. नमिता मुंदडा, आ. लक्ष्मण पवार, आ. प्रकाश सोळंके, आ. बाळासाहेब आजबे, अमरसिंह पंडित, भीमराव धोंडे, आर. टी . देशमुख, केशव आंधळे, आदिनाथ नवले, कल्याण आखाडे, रमेश आडसकर ,नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, अनिल जगताप, सचिन मुळूक, कुंडलिक खांडे , बाळासाहेब दोरतले , सुमंत धस, पी टी चव्हाण ,सलीम जहांगीर, विजयसिंह पंडित आदींची मंचावर उपस्थिती होती.
पंकजा मुंडेंनी  . या जिल्ह्याला कारस्थानाची सवय आहे. कोणी कारस्थाने करू नका. आपल्या विकासावर कोणतेही काळेढग येऊ देऊ नका . मी पराभव पचवलाय . हा पराभव माझा नव्हता तर जनतेचा होता. त्यामुळे माझी प्रत्येकावर बारीक नजर आहे.   आता मी पदर पसरून म्हणतेय,  एक काटा माझ्या मनात रुतलेला आहे. १० वर्षांपूर्वी  ४ तारखेला मला गोपीनाथ मुंडेंना हार घालायचा होता, अंत्यसंस्कार करावा लागला.  ती सल दूर करण्यासाठी  ही  शेवटची संधी मला द्या गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न माझ्या डोळ्यात आहेत. ते पूर्ण करण्याची अशी संधी पुन्हा येणार नाही. मला माझ्यासाठी नाही, तर जनतेसाठी पद हवे आहे.असे सांगितले.
खा. डॉ. प्रीतम मुंडे , आ. सुरेश धस  , आ. बाळासाहेब आजबे,रमेश आडसकर, आ. प्रकाश सोळंके ,कल्याण आखाडे , अनिल जगताप ,सुमंत धस, सलीम जहांगीर, बाळासाहेब दोरतले , पी टी चव्हाण आदींची समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविक राजेंद्र मस्के यांनी केले. सभेला जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

 

बिगर शेतीचा शेतकरीपुत्र काय करणार समाजाचे भले ? : धनंजय मुंडे
यावेळी   जातपात काहीच न पाहता या जिल्ह्यातील जनतेने अनेकांना संसदेत पाठविले आहे. घरातला पालक म्हणून मी या निवडणुकीकडे पाहत आहे. हा जिल्हा कर्तबगार माणसांना निवडणून देणारा आहे. आज तीच वेळ आली आहे.  आज जातीपातीचे राजकारण केले जात आहे, पण या जिल्ह्यात दिवंगत गोपीनाथ मुंडेंनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही. समोरचे मात्र खालच्या पातळीवर जाऊन जात, पात , धर्मावर जातायत , त्याला थारा  देऊ नका असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.  समोरच्या उमेदवाराला 'आपण मॅनेज नाही ' असं शपथ घेऊन सांगावं लागत आहे.विरोधी उमेदवार बहुरंगी आहे, बिगरशेतीचा शेतकरीपुत्र आहे .आम्ही कधी जातपात पाहिली नाही. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आम्ही सरकार म्हणून ठामपणे उभे राहिलो , कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढला, समोरचा उमेदवार आरक्षण आंदोलनात कुठे होता? कुणबी प्रमाणपत्र घेण्यासाठी मात्र हे सर्वात पुढे, हे काय समाजाचे भले करणार ? असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला.
 

 

Advertisement

Advertisement