Advertisement

एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी

प्रजापत्र | Wednesday, 17/04/2024
बातमी शेअर करा

  ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांना चार वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरून धमकीचे फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी एकनाथ खडसे यांच्यावतीने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिस करत आहेत.

 

आमदार एकनाथ खडसे यांना दाऊद छोटा शकील गँगकडून ही धमकी देण्यात आली आहे. मुक्ताईनगर पोलिसांत एकनाथ खडसे यांनी तक्रार दाखल केली आहे. ४ वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून खडसेंना धमकी दिल्याची माहिती आहे.  "वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरून धमकी देण्यात आली आहे. पहिल्या फोनवरून त्यांना फोनवरून सांगण्यात आलं की, दाऊद छोटा शकील गँग तुम्हाला मारणार आहे, हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. तर दुसऱ्या वेळी फोन आला तेव्हा त्यांनी सांगितलं की, आम्ही तुम्हाला सांगितलं तरीदेखील तुम्ही कोणती पावले उचलली नाहीत. फोननंतर मी तक्रार दाखल केली आहे."

४ ते ५ वेळा खडसेंना फोन आला आहे. एक फोन अमेरिकेवरून आला आहे, तर एक लखनऊ येथून आल्याची माहिती आहे. त्याबाबत एकनाथ खडसे यांनी तक्रार दाखल केली आहे. याआधी देखील त्यांनी धमक्या देण्यात आलेल्या आहेत. धमकीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Advertisement

Advertisement