Advertisement

सुप्रीम कोर्टाकडून पतंजलीची पुन्हा खरडपट्टी

प्रजापत्र | Tuesday, 16/04/2024
बातमी शेअर करा

योगगुरू बाबा रामदेव आणि त्यांच्या कंपनी पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांना सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा फटकारले आहे.  दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. याआधी दोन्ही सुनावणीत बाबा रामदेव यांनी बिनशर्त माफी मागितली होती. मात्र आजच्या सुनावणीत पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले आहेत.

 

 

योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजलीच्या जाहिरात प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टात बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्णही उपस्थित होते. बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी सर्वोच्च न्यायालयात वैयक्तिकरित्या माफी मागितली होती. या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने पतंजलीची माफी अद्याप स्वीकारली नसल्याचे स्पष्ट केले आहे.सुनावणीत सुप्रीम कोर्टाने बाबा रामदेव यांना विचारले की, तुम्ही म्हणाला होता की तुम्हाला आणखी काही दाखल करायचे आहे, काही अतिरिक्त दाखल केले आहे का? यावर रामदेव बाबाा यांच्या वकिलांकडून आम्ही अद्याप काहीही दाखल केलेले नाही, मात्र आम्हाला जाहीर माफी मागायची आहे. अशी भूमिका रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांची असल्याचे स्पष्ट केले.

 

पुढील सुनावणी २३ एप्रिलला..

बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांचे वकील रोहतगी यांनी १ आठवड्याची वेळ मागितली आहे. आम्ही आवश्यक ती पावले उचलू. यावर न्यायालयाने आम्ही २३  एप्रिलला सुनावणी घेऊ, अवमानाच्या आरोपींनी स्वतः काही पावले उचलण्यासाठी ही संधी आम्ही देत ​​आहोत, असे स्पष्ट केले आहे.

Advertisement

Advertisement