Advertisement

साताऱ्यातून उदयनराजेंना भाजपकडून अखेर उमेदवारी जाहीर

प्रजापत्र | Tuesday, 16/04/2024
बातमी शेअर करा

सातारा- सातारा लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा सुटला आहे. अखेर सातारच्या जागेवर भाजपकडून  खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाची घोषणा होण्याची करण्यात आली आहे.  भाजपच्या केंद्रीय कमिटीकडून प्रेसनोट जाहिर करत  उदयनराजेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

 

 

सातारा लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा कायम असताना उदयनराजेंनी  तरी जाहीर होण्याची वाट न बघता प्रचाराचा धडाका सुरूच ठेवला होता. अखेर आज हा तिढा सुटल असून साताऱ्याच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे विरुद्ध भाजपचे उदयनराजे भोसले अशी थेट लढत असणार आहे. आज त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. 

Advertisement

Advertisement