फक्त 10 वी पासची अट भारतीय लष्करात महिलांसाठी मोठी संधी
पुणे :महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमधील युवा महिलांना रोजगार मिळावा या उद्देशानं पुणे येथे महिलांसाठी लष्कर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. 12 ते 14 जानेवारीदरम्यान ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. 10 वी उत्तीर्ण महिला आणि मुलींसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. आर्मी इन्स् ट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंगच्या मैदानावर 12 ते 14 जानेवारीदरम्यान ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
कशी असेल भरती प्रक्रिया?
ज्या उमेदवारांना ओळखपत्र प्राप्त झालं आहे. अशा महिला उमेदवारांनी भरतीसाठी उपस्थित राहायचं आहे. शारीरिक परीक्षा, वैद्यकीय चाचणी आणि लेखी परीक्षा अशा तीन भागात भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. जे उमेदवार पात्र ठरले असतील त्यांची संपूर्ण तपासणी करुनच भरतीच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. शारिरिक आणि वैद्यकीय चाचणीमध्ये जे उमेदवार उत्तीर्ण होतील त्यांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होतील त्या उमेदवारांना लष्करी पोलिस दलात दाखल करुन घेतलं जाणार आहे.
भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमधील महिलांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर नावनोंदणी करणं गरजेचं आहे. या भरतीमध्ये 10 वी उत्तीर्ण महिला अर्ज करु शकतात. अर्ज केल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या मेल आयडीवर नावनोंदणी करणं गरजेचं आहे. उमेदवारांनी अर्ज भरताना संपूर्ण प्रक्रिया काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. सर्व माहिती काळजीपूर्वक भरुनच अर्ज सबमिट करावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
हेही वाचा
                                    
                                
                                
                              
