Advertisement

मनोज जरागेंच्या परळीतील महासंवाद बैठकीला न्यायालयाची सशर्त परवानगी

प्रजापत्र | Wednesday, 20/03/2024
बातमी शेअर करा

परळी येथे बुधवारी होत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या महासंवाद बैठकीला अखेर औरंगाबाद खंडपीठाने सशर्त परवानगी दिली आहे. आज सायंकाळी ६ वाजता मोंढा मैदानात ही संवाद बैठक होणार असून याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जरांगे पाटील आता नेमके काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

 

 

या सभेसाठी आयोजकांनी १३ मार्च रोजी पोलीस प्रशासनाला अर्ज केला होता. मात्र जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशाचा दाखला देत प्रशासनाने परवानगी नाकारली होती. यामुळे आयोजकांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठांमध्ये याचिका दाखल करत या सभेसाठी परवानगी मागितली. औरंगाबाद खंडपीठाने या महासंवाद बैठकीला सशर्त परवानगी दिली आहे. सोनपेठ गंगाखेड येथील आजच्या बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथील समुदाय परळीत जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सभेला जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे.

Advertisement

Advertisement