Advertisement

भोगलगावमध्ये विनापरवाना पुतळा बसवला

प्रजापत्र | Tuesday, 19/03/2024
बातमी शेअर करा

 तलवाडा (प्रतिनिधी)- तलवाडा हद्दीतील भोगलगाव येथे सोमवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला. सदरील पुतळा विनापरवाना बसवल्या प्रकरणी पोलीसांनी अज्ञात ५० ते ६० जणांविरूध्द गुन्हे दाखल केले आहेत. तर दुसरीकडे ग्रामसेवकाच्या तक्रारीवरूनही ३३ जणांसह इतर १५ ते २० पुरूष, ३० ते ३५ महिला यांच्याविरूध्द गुन्हे दाखल झाले आहेत. एकाच प्रकरणात दोन वेगवेगळे गुन्हे प्रशासनाने दाखल केले आहेत.

 

गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील भोगलगाव येथे सोमवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी अज्ञात ५० ते ६० ईसमाने बेकायदेशीर मंडळी जमावुन त्यांनी भोगलगाव येथे बसस्टॅण्ड जवळ छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा लोखंडी चबुतरा बनवून त्यांच्यावर बसवलेला दिसला सदर जागा ही शासकीय असून तेथे अनाधीकृतपणे अतिक्रमण करून मा. जिल्हादंडाधिकारी बीड यांचे आदेशाचे उल्लंघन केले कोणीतरी अज्ञात ५० ते ६० ईसमांनी विना परवाना शासकीय जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला आहे. सपोनि सोमनाथ नरके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आसाराम दगडु मरकड ग्रामविकास अधिकारी (ग्रामसेवक) रा.तलवाडा तालुका गेवराई, यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नंबर ७२ कलम ४४७,१४३,१४९,१८८, भादवी सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चव्हाण हे करीत आहेत.

 

 

Advertisement

Advertisement