Advertisement

केज शहरात दोन ठिकाणी चोऱ्या

प्रजापत्र | Saturday, 16/03/2024
बातमी शेअर करा

केज– येथील वर्दळीच्या ठिकाणी मेन रोडवर दुपारी उभ्या केलेल्या मोटार सायकलच्या डिग्गी तोडून १ लाख २७ हजार रु. ची चोरी केल्याची घटना एका किराणा दुकानासमोर घडली. तर अवघ्या बारा तासाच्या आत केज शहरातील उमरी रोडवरील एका घरात घुसून घरातील सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली.

            अधिक माहिती अशी की, दि.१५ मार्च रोजी दुपारी २.३० च्या सुमारास गोविंद मधुकर सोनवणे रा.सारणी (आ.) यांनी कळंब रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून स्वतः च्या खात्यामधून १ लाख २७ हजार रु. काढले व ते पैसे त्यांनी त्यांची मोटार सायकलमध्ये ठेवून दुचाकी (एमएच ४४/पी २९६४)  मिटकरी यांच्या किराणा दुकानाच्या समोरील रोडवर उभी करून ते एका दुकानात गेले. मात्र त्यांनी परत येऊन पाहिले असता मोटार सायकलच्या डीग्गीचे झाकण उचकटलेले दिसले. त्यांनी डिग्गीत पाहिले असता त्यातील १ लाख २७ हजार रु. व बँकेचे पासबुक कोणीतरी अज्ञात चोरट्यानी पळविले असल्याचे निदर्शनास आले. गोविंद मधुकर सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
 

Advertisement

Advertisement