Advertisement

रेल्वे पटरीवर आढळला सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा मृतदेह

प्रजापत्र | Saturday, 09/03/2024
बातमी शेअर करा

परळी वैजनाथ- बीड पोलीस दलात असणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा परळी रेल्वे स्टेशनमध्ये मृतदेह आढळला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. ही धक्कादायक घटना आज शनिवारी सकाळी समोर आली आहे. 

अधिक माहिती अशी कि, सुभाष दुधाळ असं मयताचं नाव आहे ते सध्या बीड पोलीस दलात कार्यरत आहेत. सदर मयताच्या शरीराचे दोन तुकडे झाल्याचे पहायला मिळाले. रात्री घटना केव्हा घडली माहित नाही सात वाजता पोलिसांना स्टेशन मास्तरने सांगितल्यानंतर आता मृतदेह सरकारी रुग्णालयात दाखल केला आहे. या धक्कादायक घटनेने परळीत मोठी खळबळ उडाली आहे.
 

Advertisement

Advertisement