Advertisement

परळीत वैद्यनाथांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

प्रजापत्र | Friday, 08/03/2024
बातमी शेअर करा

परळी : देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी येथीलश्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी महाशिवरात्री निमित्त भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. रात्री बारा वाजेपासूनच वैद्यनाथ मंदिर परिसरात भाविकांच्या रांगा सुरू झाल्या. हर हर महादेव, श्री प्रभू वैद्यनाथ भगवान की जय, असा जयघोष करीत भाविक दर्शन घेत आहेत. 

महाशिवरात्रीनिमित्त  राज्य व पर राज्यातून भाविक श्री वैजनाथांच्या  दर्शनासाठी परळीत दाखल झाले आहेत, धर्मदर्शन घेऊ इच्छिणाऱ्या महिला व पुरुषांची रांग व पास धारकांची  स्वतंत्र रांग लावण्यात आली आहे. मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे  . रात्री बारा वाजल्यापासूनच भाविकांची वैजनाथ मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी सुरू झाली असल्याची माहिती वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी प्रा बाबासाहेब देशमुख यांनी दिली

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्यावतीने संपूर्ण वैद्यनाथ मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व सुमारे 21 प्रकारच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे. भाविकांच्या लांबच लांब रांगा दर्शनासाठी लागलेल्या आहेत. 

 

पालकमंत्री धनंजय मुंडे वैद्यनाथचरणी लीन
कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील पहाटे वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले.  तसेच शेतकरी कष्टकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी नांदू द्या, अशी प्रार्थना प्रभू वैद्यनाथानाथांच्या चरणी केली. यावेळी वैद्यनाथ देवल कमिटीचे अध्यक्ष परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे  , सचिव   प्रा.बाबासाहेब देशमुख,विश्वस्त अनिल तांदळे, यांसह आदी उपस्थित होते.
 

Advertisement

Advertisement