Advertisement

केजमध्ये एकावर धारदार शस्त्राने हल्ला

प्रजापत्र | Tuesday, 05/03/2024
बातमी शेअर करा

केज- शहरातील वकीलवाडी सारख्या गजबजलेल्या भागामध्ये मंगळवारी सकाळी एकावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. सदरील हल्ल्यामध्ये एक साठ वर्षीय इसम गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

                     वकीलवाडी भागातील गणपती मंदिर परिसरात त्याच भागामध्ये राहणारे फर्निचर व्यावसायिक गिरधारी रामकरण शिल्लक हे गणपतीच्या दर्शनासाठी गेले असता त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला चढवला. यामध्ये गिरधारी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ हलवण्यात आले आहे. सदरील घटना नेमकी कोणत्या कारणातून झाली हे अद्याप स्पष्ट झालेली नाही. सदरील घटनेची माहिती मिळताच केज पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे.

Advertisement

Advertisement