Advertisement

 टिप्पर,ॲपेचा भीषण अपघात

प्रजापत्र | Tuesday, 27/02/2024
बातमी शेअर करा

किल्लेधारुर दि.२७ (प्रतिनिधी)  धारुर तालुक्यातील थेटगव्हाणजवळ ॲपे व टिप्परची समोरासमोर धडक होवून भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहे आहेत . जखमी हे तालुक्यातील अंबेवडगाव व गांवदरा येथील आहेत. जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन अंबाजोगाई येथे हलवण्यात आले आहे. 
सविस्तर माहिती अशी कि, तालुक्यातील थेटगव्हाणजवळ साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहे  
सुभाष बडे, रा.गांवदरा (वय ३५), हौसाबाई घुले, रा.आंबेवडगाव (वय ८०), भागवत घुले, रा.आंबेवडगाव (वय ६०), संगिता रामा घोळवे, रा.अंबेवडगाव (वय ४०), भागवत लक्ष्मण भांगे, रा. गांवदरा (वय ३८), गवळण तिडके, रा. गांवदरा (८५) जखमींना ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन अंबाजोगाई येथे हलवण्यात आले आहे. 

Advertisement

Advertisement