Advertisement

न्यायालयाच्या पार्किंगमधून वकिलाची दुचाकी चोरीला

प्रजापत्र | Saturday, 24/02/2024
बातमी शेअर करा

किल्लेधारूर-येथील न्यायालय आवारातून पार्कीग झोनमध्ये लावलेली वकिलाची मोटरसयकल चोरीस जाण्याचा प्रकार घडला. या वरून अज्ञात मोटरसायकल चोरा विरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

          धारूर येथे दिनांक २१ फेब्रुवारी रोजी धारूर न्यायालयात काम करीत असलेले ॲड.महादेव भीमराव वाव्हळ यांची मोटर सायकल क्र.एमएच ४४ एफ ४२८  हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटर सायकल न्यायालयाच्या पार्किंग झोनमध्ये नियमीत पणे लावली. या पार्कीँग झोनमधून अज्ञात चोरट्यानी सदर मोटार सायकल चोरून नेली. ॲड.वाव्हळ यांच्या तक्रारीवरून धारूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास धारुर पोलीस करीत आहे.

Advertisement

Advertisement