Advertisement

दुचाकीची बसला धडक

प्रजापत्र | Tuesday, 20/02/2024
बातमी शेअर करा

तलवाडा- गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे मंगळवारी (दि.२०) रात्री  १०च्या दरम्यान दुचाकीची बसला धडक बसून एकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.

 

अधिक माहिती अशी कि, तलवाडा येथील त्वरिता देवि मंदिराच्या जवळील बसस्थानका नजीक असलेल्या गेवराई तलवाडा रोडवर रात्री १०च्या दरम्यान पैठण ते रामपुरी बस क्रमांक (एमएच 20,बिएल 2014) हि एसटी बस तलवाडा नजीक त्वरिता देवि मंदिर नजीक अली असता. उभी असलेली बोलेरो (एमएच 14 एचके 4279) या गाडीतील अधिकाऱ्याने गाडी चुकीच्या बाजूला उभी केल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात चिमा धोत्रे यांचा जागीच मृत्यु झाला आहे. याप्रकरणी तलवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Advertisement

Advertisement