Advertisement

 लग्नाचे आमिष दाखत तरूणीवर बलात्कार

प्रजापत्र | Saturday, 17/02/2024
बातमी शेअर करा

माजलगाव - लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरूध्द बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. माजलगाव येथे शहर पोलीस ठाणे हद्दीत एका तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना दि.२५ मार्च २०२१ ते दि.२८ डिसेंबर २०२३ या कालावधीत घडली. या प्रकरणात आरोपीने पिडितेला जातीवाचक शिवीगाळ करून अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी संजय आसाराम राजुरकर (रा.सेलु जि.परभणी) याच्याविरुध्द दि.१६ फेब्रुवारी २०२४ रोजी गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास पोलीस करत आहेत.

Advertisement

Advertisement