Advertisement

 नराधाम बापाने पोटच्या मुलीवर केला बलात्कार 

प्रजापत्र | Thursday, 08/02/2024
बातमी शेअर करा

धारूर - धारूर पोलीस स्टेशन हद्दीतील अंबाजोगाई तालुक्यातील उमराई येथील बाळू गायकवाड ४१ वर्षीय नराधमाने आपल्या पोटच्या मुलीवर दारू पिऊन , मारहाण करत अत्याचार केला त्यात मुलगी गर्भवती जाली असून या अत्याचाराची माहिती आईला दिली या प्रकरणी धारूर पोलीस स्टेशन येथे आरोपी बाळू गायकवाड विरुद्ध मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

 

अंबाजोगाई तालुक्यातील उमराई येथे दारुड्या बापाकडून मुलगी गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत अधिक ची माहिती उमराई येथे गायकवाड कुटुंब हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंब चालवते विशेष म्हणजे हे कुटुंब ऊसतोड कामगार म्हणून इतरत्र कारखान्याला जाऊन आपला उदरनिर्वाह करत असते या यावर्षी अंबाजोगाई तालुक्यातील रांजणी कारखान्याला हे कुटुंब ऊसतोड कामगार म्हणून गेले होते त्या ठिकाणी काम करत असताना मुलीच्या अचानक पोटात दुखू लागल्याने तिला आईला सांगितले असता तिच्या आईने तिला अंबाजोगाई येथे सहा फेब्रुवारी मंगळवार रोजी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले.

 

 

असता डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मुलगी गर्भवती असल्याचं सांगून मुलीला रुग्णालयातील प्रसूती वार्डामध्ये ऍडमिट होण्यासाठी सांगितल्यानंतर त्यांच्याकडे कपडे किंवा कोणत्याच वस्तू उपलब्ध नसल्याने मुलगी आईसह ऊस तोडणीच्या ठिकाणी खोपी मध्ये रात्र काढून दुसर्‍या दिवशी सात फेब्रुवारी बुधवार रोजी परत रुग्णालयात येऊन प्रसूती वार्डामध्ये दाखल झाली.यावेळी अधिक चौकशी केल्यानंतर मुलीने वडिलांनीच मागील आठ महिन्याखाली राहत्या घरी आई बाहेर गेल्यानंतर दारू पिऊन अनेक वेळा मारहाण करत अत्याचार केल्याची आपबिती कथन केली यानंतर मुलीच्या फिर्यादीवरून वडील बाळू गायकवाड यांच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चिडीमार पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश सोळंके करत आहेत.

Advertisement

Advertisement