Advertisement

तीन लाख रुपये व दोन तोळ्याच्या अंगठ्या घेऊनही लग्न करण्यास नकार 

प्रजापत्र | Wednesday, 07/02/2024
बातमी शेअर करा

परळी- मुलीच्या पित्याकडून नगदी तीन लाख रुपये व दोन तोळे सोन्याच्या अंगठ्या घेऊनही लग्न करण्यास नकार दिल्याचा प्रकार परळी तालुक्यामध्ये घडला असून या प्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून मुलासह तिच्या आई-वडिलांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  प्रियंका रामचंद्र देवकते (रा. गोपाळपूर ता. परळी) या मुलीचा विवाह गेल्या काही दिवसांपूर्वी राक्षसवाडी येथील गणेश धारबा गडदे याच्या सोबत जुळला होता. लग्नामध्ये तीन लाख रुपये नगदी व दोन तोळे सोन्याच्या अंगठ्या देण्याचे ठरले होते. ठरल्यानुसार प्रियंका देवकते हिच्या वडिलांनी गडदे कुटुंबियांना तीन लाख रुपये व दोन अंगठ्या दिल्या. हुंडा घेऊनही मुलाने लग्न करण्यास नकार दिला. त्याने लग्न मोडले. लग्न मोडून पैसे व अंगठ्या परत दिल्या नसल्याने प्रियंका देवकते हिने परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गणेा धारबा गडदे, धारबा गडदे, भारतीबाई गडदे या तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच तिघे जण फरार झाल्याचे सांगण्यात येते.

Advertisement

Advertisement