Advertisement

४३ वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

प्रजापत्र | Thursday, 25/01/2024
बातमी शेअर करा

शिरूर कासार - येथील जिजामाता चौकात राहत असलेल्या ४३ वर्षीय महिलेले गळफास घेतल्याची घटना गुरुवार (दि.२५) रोजी १० ते १२ च्या दरम्यान घडली.शारदा राजेंद्र वाघमारे असे त्या महिलेचे नाव आहे. 

 

 सविस्तर माहिती अशी की, शहरातील जिजामाता चौकात राहत असलेल्या शारदा राजेंद्र वाघमारे (वय-४३) या महिलेने घरी कुणी नसतांना पत्राच्या अडूला दोरी बांधून गळफास घेतला.हि घटना गुरुवार (दि.२५) रोजी सकाळी १० ते १२ च्या दरम्यान घडली. घटनास्थळी जाऊन पोलिसांनी या प्रकरणाचा पंचनामा केला.या प्रकरणाचा पुढील तपास भाऊसाहेब भवर करत आहे.

Advertisement

Advertisement