Advertisement

दुचाकीच्या अपघातात लाईनमन ठार

प्रजापत्र | Saturday, 06/01/2024
बातमी शेअर करा

धारूर- धारुर येथून अंबाजोगाईकडे जाताना दुचाकीचा अपघात होऊन उपचारादरम्यान लाईनमनचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.५) सायंकाळी घडली आहे. या घटनेने धारुर व आडस येथे महावितरण कर्मचारी व नागरिकांमधून दु:ख व्यक्त केले जात आहे.

 

 महेश चंद्रकांत गिरी ( वय ३०वर्ष ) रा. बनसारोळा ( ता. केज ) हल्ली मुकाम अंबाजोगाई असे मयत लाईनमनचे नाव आहे. ते मागील काही वर्षांपासून धारुर येथे महावितरण कंपनीमध्ये लाईनमन म्हणून कार्यरत आहेत. मागे काही महिन्यांपूर्वी आडस येथे बदली झाली परंतु त्यांच्या काही शारिरीक अडचणींमुळे त्यांना धारुर येथे कर्तव्यावर ठेवण्यात आले. गिरी नियमित अंबाजोगाई ते धारुर असा दुचाकीवरून प्रवास करत असतं. शुक्रवारी ( दि. ५ ) नेहमीप्रमाणे ते दुचाकीवरून धारुर येथून अंबाजोगाईला जात होते दरम्यान ते आडस येथून ५ किमी अंतरावरील केंद्रेवाडी शिवारातील आश्रम शाळेजवळ आले असता दुचाकीवरून पडल्याने गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी मदत करत त्यांना तातडीने अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात दाखल केले. येथे उपचार करुन पुढील उपचारासाठी लातूर येथे घेऊन जाताना त्यांचे निधन झाले. ही घटना समजताच धारुर,आडस येथील महावितरणवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महेश गिरी यांची कर्तव्यदक्ष कर्मचारी अशी ओळख होती.

Advertisement

Advertisement