Advertisement

पोलिसांना मारहाण दोन आरोपींवर गुन्हा दाखल

प्रजापत्र | Sunday, 31/12/2023
बातमी शेअर करा

अंमळनेर - रस्त्यावर दगड टाकून रस्ता अडवणार्‍यास पोलिसांनी ताब्यात घेतल्याने पोलीस कर्मचार्‍यास शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना बीड नगर रोडवर ( हातोला फाटा) येथे घडली आहे. या प्रकरणी आरोपी विरोधात अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 अंमळनेर ठाण्याचे पो.हे.कॉ. नवनाथ रगुनाथ सानप हे नाईट ड्युटीवर होते. पेट्रोलिंग करत असताना त्यांना मोहटा देवी मंदिर परिसरातील रस्त्यावर दगड टाकलेले दिसून आले. दगड टाकणार्‍यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना भागवत बाळू राऊत, ओंकार हिरामन कुत्तरवडे (दोघे रा. हातोला ता. आष्टी) या दोघांनी शिवीगाळ करत मारहाण केली. मी मिलिट्रीचा अधिकारी आहे, तुम्ही माझे काही करू शकत नाही, अशी धमकी देखील आरोपींनी पोलीस कर्मचारी सानप यांनी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement