Advertisement

शिरूरच्या संत भगवानबाबा वस्तीगृहाच्या १० कोटीच्या आराखड्याला मंजुरी

प्रजापत्र | Friday, 13/10/2023
बातमी शेअर करा

बीड - शिरूर कासार येथे संत भगवानबाबा मुलांचे वस्तीगृह उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याच्या बांधकामाच्या सुमारे १० कोटीच्या आराखड्याला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच याच्या निविदा काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सामाजिक न्याय विभागाने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या माध्यमातून केलेले प्रयत्न आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा पाठपुरावा यासाठी उपयोगी ठरला. उसतोडणी कामगारांच्या पाल्यांच्या शिक्षणाची अब्ज होऊ नये यासाठी गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार महामंडळाच्या माध्यमातून संत भगवानबाबा विद्यार्थी वस्तीगृहाची घोषणा करण्यात आलेली आहे. बीड जिल्ह्यात शिरूर कासार येथे मुलांचे वस्तीगृह मंजूर करण्यात आले होते. त्याच्या बांधकामासाठी ९ कोटी ९१ लाखाच्या आराखड्याला राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने मंजुरी दिली. त्यामुळे आता याची निविदा काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या वस्तीगृहात १०० विद्यार्थ्यांची सोय होणार आहे.

Advertisement

Advertisement